Career Camp.आपली इच्छाशक्ती वाढविणे हे व्यक्तिमत्त्व विकासाचे मुख्य सूत्र.

 

News@करिअर शिबिर...
          "आपल्या मनाची उच्चतर क्षमता अर्जित करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय व्यक्तीमत्व विकास होणे कठीण आहे.यासाठी नवयुवकांनी आपली इच्छाशक्ती सोबतच विवेचन शक्ती सुद्धा वाढविली पाहिजे" असे प्रतिपादन ग्रामगिताचार्य "बंडोपंत बोढेकर" यांनी केले.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूरद्वारा आयोजित "छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर" नुकतेच शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात संपन्न झाले.याप्रसंगी ते "व्यक्तिमत्व विकास आणि मुलाखतीचे तंत्र" या विषयावर बोलत होते. Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp.सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी औ.प्र.संस्थेचे आय.एम. सी.चेअरमन अनिल मेहेर होते.उद्घाटन आमदार बंटी भांगडीया यांचे प्रतिनिधी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील झाडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची उपस्थिती होती.
           यावेळी 10 वी,12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील "शिक्षणाच्या संधी" Education opportunities या विषयावर प्रा.डॉ. खंगार यांनी मार्गदर्शन केले तर "व्यक्तिमत्व विकास" Personality development या विषयावर बंडोपंत बोढेकर यांनी मार्गदर्शन केले. "वैद्यकीय क्षेत्रातील संधी" Opportunities in the medical field या विषयावर डॉ.अश्विन अगडे यांनी तर "पोलीस विभागातील संधी" Opportunities in Police Department या विषयावर पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांनी मार्गदर्शन केले."वनविभागातील नोकरीच्या संधी आणि प्रशिक्षण" Job opportunities and training in forest department या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच "राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान" Contribution of youth in nation building याबाबत प्रा.अशोक चरडे यांनी संवाद साधला.या सत्रात उत्तम रांगोळीचे रेखाटन केल्याबद्दल बंडोपंत बोढेकर यांनी 4 विद्यार्थ्यांना "ग्रंथ" Granth भेट देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मुरलीधर गायकवाड,संचालन प्रकाश मेश्राम तर आभार गटनिदेशक राजेश कहुरके यांनी व्यक्त केले.
Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp...  
                    ••••••••<>••••••••
                       
                   
                मुख्य संपादक
            सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.